डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एक जण ताब्यात

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एक जण ताब्यात

मुंबई | औरंगाबाद एटीएसकडून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी जालन्यातून गणेश कपाळे या इसमाला आज (बुधवारी) ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश डीटीपी ऑपरेटर आहे. त्याचप्रमाणे जालन्यात त्याचे झेरॉक्स आणि स्टेशनरीचे दुकान आहे. डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणासह नालासोपारा स्फोटके प्रकरणीही गणेशवर संशय व्यक्त केला जात आहे. गणेश कपाळे हा आरोपी श्रीकांत पांगरकर याचा मित्र असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. श्रीकांत पांगारकरला देखील एटीसीकडून अटक करण्यात आली होती. वैभव राऊत यांच्या घरी सापडलेल्या स्फोटकांमागे श्रीकांत पांगारकरची मोठी आर्थिक मदत केली असल्याचा दावाही सीबीआयने केला होता.

याआधी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या प्रकरणात जळगावमधील एका संशयिताला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात यावल तालुक्यातील साकळी येथे विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (२२) या तरुणाला गुरुवारी ताब्यात घेतले होते. डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर वापरण्यात आलेले वाहन हे साकळी येथील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. एटीएसच्या दोन पथकांपैकी एका पथकाने विशालला ताब्यात घेऊन तात्काळ अज्ञातस्थळी हलवले आणि त्यानंतर दुसऱ्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली होती.


Next Story
Share it
Top
To Top