आर्थर रोडजेलमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

आर्थर रोडजेलमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

मुंबई : 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्याची रवानगी आर्थर रोडमध्ये केली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या बॅरेकमध्ये दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला ठेवलं होतं, त्याच बॅरेक क्रमांक 12 मध्ये मल्ल्याला ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

विजय मल्ल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षितते संदर्भातला अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला.


Next Story
Share it
Top
To Top