आठ वर्षाच्या मुलाला सोडून आई पळाली

बर्कतभाई पन्हाळकर

कोल्हापुरयेथील राजारामपुरी अकरावी गल्ली येथे मारुती मंदिरात रात्री एका निर्दयी मातेने आपल्या आठ ते दहा महिन्याच्या तान्ह्या मुलीला सोडून पळुन गेली, ही माहिती महेश यांनी पोलिसांना दिली. मात्र पोलिस हाकेच्या अंतरावर असता देखील दोन तास उशिरा पोहोचले .यामुळे ती महिला पसार झाली.

महीलेने बाळाला सोडुन गेल्याने वातावरण भीतीचे व गंभीर झाले होते.

सोडुन गेलेल्या आईची माया गेली कुठे,त्याच वेळी माणुसकीतील माया जागी झाली आणि नगरसेविका प्रतिदन्या ऊत्तुरे, महेश ऊत्तुरे, अलताफ मकानदार, अनिल घोडके, अविनाश भोसले,धनपाल साठे, किरण साठे, रज्जत ओसवाल आदीनी या बाळाला, दुध, बिस्कीट ,कपडे दिले त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनला माहीती दिली. त्यानंतर चाईल्डचे प्रतिनीधी येवुन या बाळाला संगोपनासाठी ताब्यात घेतले.

केवळ पोलीस उशिरा पोहोचल्यामुळेच त्या बाळाला टाकून महिलेला पळून जाणे शक्य झाले. याला राजारामपुरी ठाण्याचे पोलीसच जबाबदार आहेत असा आरोप उत्तुरे यांनी केला.

ही महिला १३ वर्षाचा मुलगा दोघेही बँक ऑफ महाराष्ट्र व एका गॅरेजमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामुळे पोलिसांनी आता तरी तिचा शोध घ्यावा, अशी मागणी उत्तुरेसह नागरीक करीत आहे.

हे बाळ त्या महीलेचे की दुसऱ्या कोणाचे आहे. ही महिला कोण व कोठुण आली, बाळाला सोडुन महिला का गेली, त्यांनी बरं वाईट करून घेतलं का असे अनेक प्रश्ऩ डोळ्या समोर ऊभे रहात आहेत,


Next Story
Share it
Top
To Top