बँक आॅफ महाराष्ट्राची रोकड लुटली

पंढरपूर: बँक आॅफ महाराष्ट्रची ७० लाखांची रोकड घेऊन निघालेली आय ट्वेंटी गाडी अडवून दरोडेखोरांनी लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून संपूर्ण जिल्ह्यात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचा पाठलाग करत चार दरोडेखोरांनी आपली बोलेरो गाडी आडवी लावत ही गाडी अडवली. त्यानंतर बँकेच्या आय ट्वेंटी गाडीतील कर्मचा?्यांच्या डोळ्यात या दरोडेखोरांनी तिखट फेकत गाडीची काच फोडली आणि रक्कम घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे ही रक्कम नेत असताना बँकेच्या गाडीसोबत सुरक्षारक्षक नव्हते. बँकेची एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून सुरक्षारक्षकांशिवाय कशी नेली जात होती याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस याचाही तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top