नाशिक- चेष्टा करणे जीवावर बेतल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली. शहरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चेष्टा केल्याचा रागातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की,त्यामध्ये आरोपी कैलास शेजुळ याने विशाल प्रकाश झाल्टे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात प्रकाशचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी कैलासला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विशाल प्रकाश झाल्टे (वय २३, रा. पंचशीलनगर) याच्यावर कैलास शेजुळ (वय ३५, रा. पंचशीलनगर) याने कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
चेष्टा जीवावर बेतली, रागात कु-हाडीने एकाची हत्या
2 Jan 2018 1:17 PM GMT
नाशिक- चेष्टा करणे जीवावर बेतल्याची घटना...
Next Story