भंगारवाला ते करोडपती

भंगारवाला ते करोडपती

मुंबई – लोकांच्या उपयोगाच्या नसलेल्या वस्तू विकून उदरनिर्वाह करणारा एक भंगारवाला करोडपती होऊ शकतो का, या प्रश्नाच उत्तर नाहीच असं येईल. मात्र, हसन अली नावाचा एक भंगारवाला त्याला अपवाद ठरला होता.

हैद्राबाद इथं 1953 मध्ये जन्मलेला हसन अलीचा भंगारवाला ते करोडपती हा प्रवास थक्क करणारा आहे. प्राथमिक शिक्षण अलीनं इथेच पूर्ण केल. घरची परिस्थिती बेताचीच होती. म्हणून त्यानं उदरनिर्वाहासाठी भंगारचा व्यवसाय सुरू केला. भंगाराच्या व्यवसायात त्याला चांगलाच फायदा झाला. त्यानंतर त्याने कार भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनही त्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली.

अलीचं हे यश एकट्याच नाही, त्यात त्याच्या दोन्ही पत्नीचा मोठा वाटा आहे. अलीची पहिली पत्नी उन्नीसा बेगम ही हैदराबादची तर दुसरी पत्नी रहिमा ही पुण्याची. उन्नीसा ही हैदराबादच्या निजाम घराण्यातली आहे. तिच्या माध्यमातून हसन अली हा श्रीमंतांच्या संपर्कात आला.

अलीनं भंगार व्यवसायाबरोबरच पुरातन वस्तुंचा व्यवसायही सुरु केला. त्यानंतर त्याची भेट शस्त्रास्त्रांचा व्यापारी अदनान खशोगीबरोबर झाली. अदनानच्या मदतीने अलीनं हवाला आणि शस्त्रास्त्राचा व्यापार सुरु केला. हैदराबादमध्ये व्यावसायिक भांडणं झाल्यानंतर 1999 मध्ये हसन अली पुण्यात आला. याच शहरानं त्याचं नशीब बदललं. पुण्यात त्याने घोड्याच्या ब्रीडिंग आणि रेसिंगचा धंदा सुरु केला. तेथेच त्याची भेट हॉर्स ट्रेनर फैसलची बहीण रेहीमा सोबत झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले. हसन अलीनं आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि रहिमा सोबत लग्न केले. आपल्यापेक्षा 22 वर्षे लहान रहिमापासून हसन अलीला एक मुलगा आहे.

रहिमाला हसन अलीची सर्व माहिती आहे. हसन अली हा आपल्या मेहुण्याच्या मदतीने हैदराबादमध्ये घोडावाला या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर त्याने पुर्ण देशात घोडे पाठवणे सुरु केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हसन अलीचे घोडे लंडनसह अन्य ठिकाणी स्पर्धेत सामील झाले होते. पुण्यात हसन अलीचे काही बंगले आणि फ्लॅटस आहेत. याशिवाय मुंबईत पेडर रोडवर एक कॉम्पलेक्स आहे. सध्या हसन अली हा देशातला सर्वात मोठा टॅक्स चोर म्हणून ओळखला जात आहे. त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे. ईडीच्या माहिती नुसार 2001 ते 2008 दरम्यान 10000 हजार कोटी रूपयांचा काळा पैसा अलीनं कमावल्याची माहिती पुढं आली.


Next Story
Share it
Top
To Top