भाजप नगरसेवकाची पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण

भाजप नगरसेवकाची पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण

मेरठ | मेरठमधील कंकरखेडा येथील एका हॉटेलच्या मालक आणि पोलीस अधिकारी यांच्या झालेल्या वादानंतर भाजप नगरसेवक मनीष कुमार याने एका पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील भाजप नगरसेवक मनीष कुमार याने एका पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1053565500456947712

पोलीस अधिकारी एका महिला वकिलांसोबत जेवण करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी काही कारणास्तव हॉटेल मालक आणि त्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्या हॉटेल मालकाने तेथील भाजप नगरसेवक मनीष कुमारला बोलवून घेतले. भाजप नगरसेवक तेथे आल्यानंतर त्याने पोलीस अधिकाऱ्याशी वाद घातला. त्यानंतर चक्क पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, आरोपी मनीष कुमारला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1053576675412377600


Next Story
Share it
Top
To Top