मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

मुंबई – हत्येची शिक्षा भोगत असलेली कैदी मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेची साक्षीदार इंद्राणी मुखर्जीनं न्यायालयात ही धक्कादायक माहिती दिली. सत्र न्यायालयात इंद्राणी मुखर्जीनं सांगितलं की, कैदी मंजुळा शेट्येवर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. मंजुळाच्या गळ्याला ओढणी आवळून तिला बेदम मारहाण कऱण्यात आली. हा क्रुरपणा एवढ्यावरच थांबला नाही. मंजुळाच्या गुप्तांगामध्ये काठीनं हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती यावेळी इंद्राणीनं न्यायालयाला सांगितली.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीनं कारागृह प्रशासनानं मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयच्या न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्याचा, सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला आहे. मंजुळाच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्युनंतर राज्यातील एकूणच तुरूंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/


Next Story
Share it
Top
To Top