कॅडबरीत अळ्या, जरा सावधान..

कॅडबरीत अळ्या, जरा सावधान..

.मंबई: कॅडबरीमध्ये किडे सापडल्याने या कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड ग्राहक मंचाने ठोठावला आहे. तसेच ग्राहकाला पाच रुपयांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. गुंटूरमधील ब्रॉडीपेटमध्ये राहणा-या अनुपमा यांनी १७ जुलै २०१६ रोजी दोन कॅडबरी डेअरी मिल्क (रोस्ट आलमंड) खरेदी केल्या होत्या. अनुपमा यांच्या कुटुंबीयांना डेअरी मिल्ककडू लागल्या.

त्यानंतर डेअरी मिल्क नीट पाहिल्यावर अनुपमा यांना त्यामध्ये किडे आढळून आले. यानंतर त्यांनी माँडलेज कंपनीला मेल करुन तक्रार दाखल केली. या मेलमधून त्यांनी किडे असलेल्या कॅडबरीचे फोटोदेखील कंपनीला पाठवले. यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी त्वरित अनुपमा यांच्याशी संपर्क साधला आणि हा विषय वाढवू नका, अशी विनंती केली. यानंतर कंपनीचा प्रतिनिधी अनुपमा यांच्याकडील कॅडबरीचे सॅम्पल घेऊन गेला.


Next Story
Share it
Top
To Top