चंद्रपूर | नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या गाडीने एका पोलिसाला चिरडल्याची घटना घडली आहे. प्रकाश मेश्राम असे या पोलीस शिपायाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1087196909037674496
पोलिसांना यवतमाळहून नागपूरकडे जाणाऱ्या एका गाडीतून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेट्स लावण्यात आले. जेव्हा हे वाहन चेकपोस्टवर आले तेव्हा पोलिसांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र तसे न करता चालकाने गाडीचा वेग वाढवत गाडी पोलीस शिपायाच्या अंगावर घातली. यात या शिपाई पोलिसांचा चिरडून मृत्यू झाला.
काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किडे यांना देखील अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या एका गाडीने चिरडले होते. यावेळी उपचारादरम्यान किडे यांच्या मृत्यू झाला.