CGST ठाणे आयुक्तालयाकडून 8 कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

CGST ठाणे आयुक्तालयाकडून 8 कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

मुंबई | ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेट उघडकीस आणले असून दहिसर येथील एका फर्मच्या मालकाला अटक केली आहे. CGST मुंबई झोनच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटच्या विशिष्ट इनपुटवर कारवाई करून, CGST ठाणे आयुक्तालयाच्या शाखेने मेसर्स जे.जे. लाइम डेपो विरुद्ध तपास सुरू केला. सदर कंपनी बांधकाम साहित्याचा व्यापार करत होती. या फर्मने त्यांच्या आर्थिक नोंदींमध्ये फसवणूक करून ८.०५ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता.


या फर्मने सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता ४० कोटी हून अधिक रकमेच्या बोगस पावत्याही जारी केल्या होत्या. कमिशनसाठी अनेक मुंबईस्थित पायाभूत सुविधा कंपन्यांना बनावट पावत्या जारी केल्या असल्याचे या फर्मच्या मालकाने कबूल केले आहे. CGST कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याला काल १२ मे २०२२ रोजी CGST कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला आज १३ मे २०२२ रोजी माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी CGST अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात, CGST ठाणे आयुक्तालयाने रु. १३५४ कोटी रुपये ची GST चोरी शोधली होती आणि ३४ कोटी वसूल केले तसेच ७ करचोरी करणाऱ्यांना अटक केली. CGST आयुक्तालय ठाणे या आर्थिक वर्षातही करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम सुरूच ठेवणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top