नागपूर- महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील पोलीस अजुनही गंभीर नसल्याचं नागपूरमधील एका घटनेनं समोर आले आहे. ‘गुंडाने बलात्कार केल्यानंतरच तक्रार द्यायला या, धमकीची तक्रार नको’ असे संतापजनक उत्तर पोलिसांनी तक्रारकर्त्या मुलीला दिले आहे. तक्रारकर्त्या तरुणीने काही दिवसांपूर्वी आरटीआयचा वापर करत अतिक्रमणाविरोधात महापालिकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. मात्र या कारवाईनंतर गुंडांकडून या तरुणीला धमक्या यायला सुरुवात झाली. याविरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी तरुणी गेली असता तिला हे धक्कादायक उत्तर ऐकायला मिळाले. तक्रारकर्ती तरुणी तिच्या कुंटुंबासोबत नागपूरातील सक्करदरा भागात राहते. तिने केलेल्या अतिक्रमणविरोधी तक्रारीमुळे तिच्या घरावर रात्री दगडफेक करणे, दारावर लाथा मारणे, अश्लिल शिव्या देणे, हत्यारे दाखवून धमकावत या गुंडांनी तिच्या कुटुंबीयांचा छळ सुरु केला आहे. त्यातच काल मध्यरात्री १५ ते २० गुंडानी येऊन तक्रारकर्त्या तरुणीला बलात्काराची धमकी देखील दिली. या घटनेची तक्रार करायला सक्करदरा पोलिसांकडे गेल्यावर ‘गुन्हा घडल्यावर तक्रार द्या’ असे संतापजनक उत्तर पोलिसांनी दिले आहे.
गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार द्या’तक्रारकर्त्या तरुणीला पोलिसांचे संतापजनक उत्तर
2 Jan 2018 1:33 PM GMT
नागपूर- महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील पोलीस...
Next Story