सोशल मीडियातून खून केल्याची कबुली, आरोपी पोलिसांना सापडेना

सोशल मीडियातून खून केल्याची कबुली, आरोपी पोलिसांना सापडेना

चंदिगड - अमृतसरमधील एका गुंडाने फेसबूकवर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सराज संधू असे गुंडाचे नाव असून त्याने फेसबूकवर आपणच हिंदू संघर्ष सेनाचा नेता विपन शर्मा याची हत्या केल्याचं सांगितले आहे. त्याने खुनाची कबुली दिली असली तरी त्याच छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. विपन शर्मा यांनी 30 ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती, आणि तेव्हापासूनच सराज संधू फरार आहे. सराज संधूच्या फेसबुक पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या पंजाब पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 'ही पोस्ट स्वत: सराज संधूने टाकली होती, की अन्य कोणी केली होती याची माहिती आम्ही मिळवत आहोत, तो कदाचित काही लोकांच्या संपर्कात असावा', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


Next Story
Share it
Top
To Top