जालन्यामध्ये कुंटणखान्यावर कारवाई; ७ महिलांसह ३ जण अटक

जालन्यामध्ये कुंटणखान्यावर कारवाई; ७ महिलांसह ३ जण अटक

जालना शहरातील मोदीखाना भागात एका कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी ७ महिलांसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मोदीखाना भागात एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर हा व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत ३७ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दामिनी पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे यांच्या फिर्यादीवरून बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Next Story
Share it
Top
To Top