दलित मुलीवर तिघांचा गँगरेप, बदनामीची भीती दाखवून मुलीचा महिनाभर छळ,शेवटी मुलीने केली आत्महत्या

दलित मुलीवर तिघांचा गँगरेप, बदनामीची भीती दाखवून मुलीचा महिनाभर छळ,शेवटी मुलीने केली आत्महत्या

हरियानातील पालवा गावत पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय दलित मुलीला उचलून नेऊन तीन तरूणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल, प्रवीण आणि कालाने असे आरोपीचे नाव आहेत तिच्यावर बलात्कार केल्यानंतर गावात बदनामी करण्याची धमकी देऊन महिनाभर तिचा छेड काढत होते तिने तेही सहन केली, त्या मुलीच्या घरावर अश्लिल फोस्टर लावून तिला मानसीक त्रासही दिला. ऐवढ्यावर न थांबता येता जाता तिचा छेड काढत होते. छेडछाडला कंटाळून मुलीने आत्महत्या केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून आरोपी फरार आहेत.

पीडित मुलीच्या वडीलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 'एक महिन्यापूर्वी माझी मुलगी मंदिराजवळ पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिन जणांनी तिला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 'मुलीने घरी येऊन तिच्या आईला सर्व हकिकत सांगितली. समाजात बदनामी होईल या भीतीने आम्ही याबद्दल कुठे वाच्यता केली नाही. मात्र मुलीसोबत पुन्हा असे होऊ नये यासाठी त्या तिन्ही मुलांच्या कुटुंबियांकडे त्यांची तक्रार केली.

मात्र याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यानंतर त्या तिघांनी माझ्या मुलीला रस्त्यात छेडण्यास सुरुवात केली. आमच्या घराभोवती चक्कर मारायला लागले. माझी मुलगी घरातून काही कामानिमित्त बाहेर पडली की तिचा पाठलाग करुन अपशब्द वापरत आणि रस्त्यात तिची छेड काढत होते.'


Next Story
Share it
Top
To Top