
दिवसा स्पा सेंटरमधून झळकणाऱ्या एका इमारतीमध्ये रात्री रासक्रीडा चालत असे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जेव्हा या सेंटरवर छापा मारला त्यांना आतमध्ये भलतेच चित्र आढळून आले. मसाज करण्यासाठी मोठे बेड ठेवलेले होते. या ठिकाणी रात्री सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. स्पा सेंटरमध्ये पोलिसांना अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यानुसार या ठिकाणी सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे आढळून आले. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी ग्राहक बनून स्पा सेंटरमधील नंगानाच डोळ्यांनी अनुभवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना चक्क पंधरा तरूणी उच्चभ्रू ग्राहकांना सेवा देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. परंतु हे सेंटर चालवणारी अंटी पळून जाण्यात यशस्वी झाली. मध्यप्रेदशमधील भोपाळमध्ये एक उच्चभ्रू वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला.