100 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

100 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

मेरठः गुन्हेगारीसाठी उत्तरप्रदेश देशात कुप्रसिद्ध आहे. वृद्ध महिलेवर अपहर करून सामुहिक बलात्कार करण्याचे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहेत. परंतु मेरठमध्ये तर सर्व गुन्हायाचा कळस गाठला गेला आहे. दारुच्या नशेत तर्र असलेल्या एका तरुणांने शंभर वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार केला आहे. महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधामाला पकडण्यात आले असून त्याचे अंकित पुनिया असे आहे. त्याने महिलेवर बलात्कार केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. अंकित पुनिया महिलेवर जबरदस्ती करत असताना ती ओरडायला लागली. महिलेचा आवाज ऐकून तिचा भाऊ आणि शेजारी त्याठिकाणी आले. तेव्हा अंकित पुनियाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अंकित पुनिया याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल केले. मात्र,पुनियाने आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय.


Next Story
Share it
Top
To Top