पैशाची आमिष दाखवून एका तरूणीला शरीरविक्र लावणा-या महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मंगल बागडे असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेला केर्टात हजर केलेल असता कोर्टाने दोन दिवसाची पोलिस कोटडी सुनावले आहे .
मानपाडा परिसरात मंगला एका महिलेकडून शरिरविक्रीचा व्यवसाय़ करून घेत असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र दौडकर यांनी एक पथकाला घेऊन १० ऑक्टोबर रोजी वाघबीळनाका, दलाल इंजिनीअरिंग वर्कसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. तिच्या ताब्यातून ३० वर्षीय पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.
बागडे हिच्याकडून तीन हजार ३८० ची रोकड आणि दोन मोबाइल असा ९ हजार ३८० चा ऐवज हस्तगत केला. तिच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कोणती टोळी सामील आहे का? आणखी किती महिलांची तिने अशा प्रकारे फसवणूक केली