आईनेच केली आपल्या मुलाची हत्या ?

आईनेच केली आपल्या मुलाची हत्या ?

लखनऊ | उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांचा मुलगा अभिजीत यादवच्या हत्या प्रकरणात संभ्रम निर्माण झाला आहे. रमेशच्या आईनेच त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली होती. अभिजीत मद्यपान करुन घरी येऊन धिंगाणा घालायचा म्हणून त्याची हत्या केल्याचे त्याच्या आईने पोलिसांसमोर कबुल केले होते. मात्र आता पुन्हा त्या 'आपण आपल्या मुलाची हत्या' केली नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. रमेश यादव यांचा मुलगा अभिजीतचा मृतदेह काल (रविवारी) हजरतगंजमधील त्याच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.

https://twitter.com/ani_digital/status/1054252534691438592

सुरुवातीला यादव कुटुंबीयांनी पोलिसांना कोटी माहिती देत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांना मात्र संशय येत होता. पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनातून अभिजीतचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती. यादव कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर अभिजीतची आईने आपण आपल्या मुलाची हत्या केल्याचे पोलिसांसमोर कबुल केले होते.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ?

"अभिजीत शनिवारी रात्री उशीरा घरी आल्यानंतर आपल्या छातीत दुखत असल्याचे त्याने आपल्या आईला सांगितले होते. यानंतर आईने त्याच्या छातीला मालीश केल्यावर तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या दृष्टीस पडला," अशी खोटी माहिती यादव कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आली होती. अभिजीतचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे भासवत यादव कुटुंबाने त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली होती.


Next Story
Share it
Top
To Top