डीएसकेंना कोणत्याही क्षण अटक होणार

डीएसकेंना कोणत्याही क्षण अटक होणार

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या अटकपूर्व जामीनावर उच्च न्यायालयात सुनवाणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने डीएसकेवर ताशेरे ओढले. त्यांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे न्यायालयाने सांगितले.

डीएसकेंना आता एकही संधी देण्याची अजिबात इच्छा नाही नसल्याचे सांगत गुंतवणुकदारांबद्दल वाईट वाटत असल्याचे हायकोर्टाने यावेळी नमूद केले आहे. डीएसकेंबाबत 22 फेब्रुवारीला अंतिम निर्णय होणार असेल, तर डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण आम्ही आज दूर करतो, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

डीएसकेंचे पासपोर्ट तातडीने जमा करा, अशा सूचना हायकोर्टाने सर्व विमानतळांना देण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. परंतु, डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल कशावरुन? असा सवाल कोर्टाने यावेळी उपस्थित केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top