नीरव मोदीच्या कार्यालयावर ईडीचे छापे, मोदी मल्ल्याप्रमाणे परेदशात पळाला

नीरव मोदीच्या कार्यालयावर ईडीचे छापे, मोदी मल्ल्याप्रमाणे परेदशात पळाला

मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360कोटींची गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. हिरेव्यापारी नीरव मोदीसह बँकेतील अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असून त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे देशाचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान, या घोटाळ्यानंतर नीरव मोदीच्या काला घोडा परिसरातील कार्यालय व शोरूमसह 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. ही कारवाई सुरू असताना नीरव मोदी मल्ल्याप्रमाणे परदेशात पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या घोटळ्यातून काहीच हाती लागण्याची शक्यता नाही.

या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने जाहीर केलेली नसली तरी दोन दोषी बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नीरव मोदी हा या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुंबईतील एका शाखेतून त्याने 11 हजार 360 कोटींची गैरव्यवहार केला आहे.

असा झाला गैरव्यवहार

- पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा

- सुमारे ११,४२७ कोटी रुपये संबंधितांनी विदेशात राहून वळवले

- परदेशात पेमेंट करताना स्विफ्ट खात्याचा वापर

- आयातीचा व्यवहार दाखवला पण प्रत्यक्षात झाला नाही

- नीरव मोदीसह तीन सहकाऱ्यांकडून 3 कंपन्यांद्वारे घोटाळा

- बँकेकडून संशयितांच्या नावाचा उल्लेख नाही

- बँकेतील आधीच्या २८0 कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदीचे नाव

- नीरव मोदीच घोटाळ्याचा सूत्रधार असण्याची दाट शक्यता

- घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात

- अलाहाबाद बँक, युनियन बँक, अ‍ॅक्सिस बँक संकटात


Next Story
Share it
Top
To Top