HW News Marathi
क्राइम

बीडच्या RTO कार्यालयात बोगस कर पावत्या; एजंटवर गुन्हा दाखल

बीड | आरटीओ कार्यालयात नेमकं चाललंय काय? असाच प्रश्न उपस्थित करणारा प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करणारं रॅकेट बीड आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनी उघडकीस आणलं होतं. तर आता पुन्हा एकदा बोगस कर पावत्या दाखल करणाऱ्या दलाल एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांना, एमएच -43 डी -9535 व एमएच -43 बीजी -7089 प्रो.एस.जे.टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स या वाहनांचे वाहनकर संगणकावर ऑनलाईन करुन देण्यासाठी दाखल केलेले अर्ज पाहून संशय आला. यामुळं सोबत जोडलेल्या वाहन कर पावत्या एमएच 23 आर -22010000016, एमएच -22 011136245358 व एमएच -23 आर -21120000007, एमएच – 21 120641785011 दाखवून सदर पावत्याचे संगणकीय ऑनलाईन सत्यता पडताळणी करण्याचे आदेशित केले होते. त्यामुळं सदर मोटारवाहन पावत्या तपासणी केल्या असता बनावट असल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी सदर अर्ज दाखल करणाऱ्या दलाल एजंट नदीम याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420 , 461 , 468 , 471 , 511 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच आरटीओ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या पाच दलाल एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता पुन्हा एकदा चक्क कर पावत्या बोगस दाखल करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं बीडच्या आरटीओ कार्यालयात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशीत NCB ला कबुली, म्हणाला-

News Desk

दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिर-याला महिलांनी घातला घेराव

News Desk

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk