येवला | येवला-मनमाड मार्गावर इर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात येवला-मनमाड मार्गावरील अनकाई बारीजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात इर्टिंगा कारचा अक्षरश: चुराडा झाला.
या कारमधील जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नगर आणि कोपरगाव येथील रहिवासी होते. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आयशर गाडी मनमाडच्या दिशेने जात होती, तर इर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.