राम रहिमच्या सेवेसाठी अडीचशे साध्वी

राम रहिमच्या सेवेसाठी अडीचशे साध्वी

पंचकुल- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम याने सेवा करण्यासाठी तब्बल दोनशेहून अधिक तरुणींना कामाला ठेवले होते. बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुरमीत राम रहीमनं खासकरुन आपल्या सेवेसाठी साध्वींची ड्युटी लावली होती. गुरमीत राम रहीमने स्वतःच्या सेवेसाठी जवळपास 200 ते 250 साध्वी तैनात केल्या होत्या, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या या साध्वींना कोणत्याही पुरुषासोबत संवाद साधण्याची सक्त मनाई करण्यात आली होती. या साध्वी ज्या ठिकाणी वास्तव्यास होत्या तिथून 8 ते 10 फूट अंतरावरही पुरुषांना पाऊल ठेवण्यास बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एका साध्वीने पाठवलेल्या पत्राच्या आधारे राम रहीमच्या सेवेत हजर असणाऱ्या या साध्वींवर कित्येक प्रकारे अत्याचार होत असल्याची धक्कादायक व गंभीर बाब उजेडात आली होती. गुरमीत राम रहीम हा सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या साध्वींचं लैंगिक शोषण करत होता, असा आरोप आहे. पत्रात असेही नमूद करण्यात आले होते की, राम रहीमच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या या साध्वींचे वय 35 ते 40 दरम्यान होते. या साध्वींचे आयुष्य खूपच वाईट असते. --


Next Story
Share it
Top
To Top