दोन हजार रूपये लाच घेतल्या प्रकरणी वनपालास ४ वर्ष कारावास

उत्तम बाबळे नांदेड अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत कर्मचारी असलेल्या वर्ग ३ च्या एका वनपालाने सन २०१२ मध्ये दोन हजार रुपयाची लाच घेतल्याचा खटला न्याय प्रविष्ठ होता.अंतिम युक्तीवादानंतर २० जून रोजी या न्यालयाचे विशेष न्यायाधीश एम.एस.शेख यांनी त्या वनपालास सबळ पुराव्यानूसार दोषी ठरविले व या गुन्ह्यात त्यास ४ वर्ष सक्त मजूरीची आणि रोख ३ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा दिली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय भोकर अंतर्गत उमरी तालुक्यात कार्यरत असलेले वर्ग ३ चा कर्मचारी वनपाल जेजेराव देवराव मुंडे,रा.पवार काॅलनी भोकर यांनी उमरी तालुक्यातील एका शेतक-याच्या शेतातील सागवान वृक्ष तोड करण्यासंबंधी आवश्यक तो पंचनामा करुन अहवाल देण्या संबंधी त्या शेतक-यास लाच मागीतली होती.

याबाबद त्या शेतक-याने रितसर तक्रार दिल्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलीस उप अधीक्षक नईम हाश्मी व त्यांच्या पथकाने साफळा रचून वनपाल जेजेराव मुंडे यांना २७ फेब्रुवारी २०१२ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान आंबेडकर चाैक भोकर येथील चहाच्या हाॅटेल मध्ये नियोजित रक्कम दोन हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.या प्रकरणी भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेजेराव मुुंडे विरुध्द भोकर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.यानूसार हा खटला न्याय प्रविष्ठ होता. या खटल्यात सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले आणि उपलब्ध सबळ पुराव्या आधारे वनपाल मुंडे हे दोषी सिद्ध झाल्यावरुन विशेष न्यायाधीश एम.एस.शेख यांनी वनपाल जेजेराव मुंडे यांना लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवले व त्यांना ४ वर्षे सक्त मजूरी आणि रोख ३ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे या खटल्याची बाजू भक्कम पणे अॅड. साईनाथ कस्तुरे यांनी मांडली. तसेच ती बाजू भक्कम करण्यासाठी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पो. नि. संगीता पाटील व पोलीस कर्मचारी मिलिंद बोडके यांनी विशेष सहकार्य केले.


Next Story
Share it
Top
To Top