फेसबुकवर मैत्री,आमिष,अतिप्रसंग आणि खंडणी

फेसबुकवर मैत्री,आमिष,अतिप्रसंग आणि खंडणी

नागपूर फेसबुकवर एका विवाहितेशी मैत्री केली त्यानंतर तिला नौकरची आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आरोपी यवड्यावरच थांबला नाही तर महिलेला सोडण्यासाठी महिलेच्या घरांच्याना एक लाख रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी उच्चशिक्षित तरूणाला पंढरपूर येथून अटक केली आहे. रूपेश संत असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी रुपेश संत हा उच्चशिक्षित आहे. पोहरादेवी येथील महिलेशी फेसबुकवरून मैत्री केली. याच मैत्रीचा फायदा घेत महिलेला चांगली नोकरी लावतो आमिष देवून त्या महिलेला पुण्याला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावर न थांबता महिलेच्या नातेवाईकाला 1 लाख रुपये द्या, मग मुलगी तुम्हाला परत करतो अशी त्याने धमकीही दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर मानोरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोहरादेवी येथील विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार 29 ऑगस्ट 2017 रोजी तिच्या पतीने मानोरा पोलिसात दिली़ होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनी पथक नेमले होते. पोलिसांनी दीड महिने तपास केल्यानंतर अखेर यश मिळाले आहे. पोलिसांना 5 ऑक्टोबर रोजी आरोपीला सोलापूर येथून अटक करून पीडित विवाहितेला अक्कलकोट येथून ताब्यात घेतले आहे.


Next Story
Share it
Top
To Top