भावाचे हातपाय बांधून अल्पवयीनेवर सामूहिक बलात्कार

भावाचे हातपाय बांधून अल्पवयीनेवर सामूहिक बलात्कार

अमरावती - जंगलात औषधी आणण्यासाठी गेले असताना भावाचे हातपाय बांधून त्यांच्यादेखत 13 वर्षीय बहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. चांदुर रेल्वे तालुक्यातील परसोडा जंगलात रविवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहेत. सुगाव्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.

पीडित भाऊ-बहिण परसोडा परिसरात राहतात. शेतमालकाने सांगितलेली जडीबुटी आणण्यास पीडित मुलगी आणि चुलत भावासह जंगलात गेली होती. या वेळी त्यांच्या मागावर आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूच्या धाकावर बालिकेच्या भावाचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. त्यानंतर दोघा नराधम भावासमोरच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.


Next Story
Share it
Top
To Top