एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष बेपत्ता प्रकरण, एक जण पोलिसांच्या ताब्यात

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष बेपत्ता प्रकरण, एक जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिद्धार्थ संघवी (३९) बुधवारपासून बेपत्ता असून नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केले आहे. परंतु संघवी यांचा मृतदेह सापलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संघवी हे दक्षिण मुंबईतील मलाबार हिल या उच्चभ्रू परिसरात कुटुंबासोबत राहतात. संघवी बुधवारी घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर शोधाशोध केल्यानंतर एन. एम. जोशी मार्ग येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

संघवी यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातील एका इमारतीजवळ शनिवारी आढळून आली. कारच्या पुढील सीटवर रक्ताचे डाग आणि चाकू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि संघवी यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Next Story
Share it
Top
To Top