पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

थिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी संध्याकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका ४१ वर्षांच्या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक हत्या केल्यानंतर नराधमाने त्या महिलेचे स्तन कापून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी थोदुपुझा येथील ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.'

सलीना असे मृत महिलेचे नाव असून ती अडिमली येथील रहिवासी अब्दुल सियादची पत्नी असल्याची माहिती मिळाली आहे. सलीना ही समुपदेशक म्हणून काम करायची. आरोपी गिरीशविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणातून सलीना आणि गिरीशची ओळख झाली होती. त्यावेळी सलीनाने त्याच्याकडून १ लाख ८ हजार रुपये घेतले होते. पण ते पैसे तिने परत केले नाहीत. तसेच गिरीशने तिच्यासाठी हप्त्यावर कारही खरेदी केली होती. पण तिने त्याचे हप्तेही वेळेवर फेडले नाहीत. गिरीशला पैशांची खूपच गरज होती. सलीनाला दिलेले पैसे घेण्यासाठी तो तिच्या घरी गेला. त्यावेळी तिने पैसे परत करण्यास नकार दिला. याच रागातून त्याने तिची हत्या केली. तसेच तिचा स्तन कापून तुकडे केले आणि बॅगमध्ये भरून तो घरी परतला.


Next Story
Share it
Top
To Top