सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top