HW News Marathi
क्राइम

घरासमोर लगवी केली म्हणून दोन गटात मारामारी एकाचा मृत्यू तर १२ जखमी

नांदेड हदगाव दत्तबर्डी येथील रस्त्यावरील घरासमोर लगवी केली म्हणून दोन घटात मारामारी झाली आहे. यात 28 वर्षीय कैलास संबाझी मांजरे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य १२ जण जखमी झाले आहे. जखमीना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हदगांव शहरातील दत्तबर्डी रस्त्यावरील नाईक नगर तांडा येथे संभाजी मारोती मांजरे व विष्णु चंदू पवार या दोघांची घरे एकमेकांच्या समोरा समोर आहेत.दि.१९ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान जेवन करुन माजरे कुटूंबातील सदस्य घराबाहेर अंगणात गप्पा मारत बसलेले असतांना विष्णू पवार हा लघवी करण्यासाठी अंगणात आला व त्याने लघवी केली.असे केल्याने मांजरे कुटूंबीयांनी आमच्या घरच्या बायका,पोरी व आम्ही सर्व जण येथे बसलेले असतांना आमच्या समोर लघुशंका करतोस तुला कांही वाटत नाही का ? असे म्हणून जाब विचारला.आणि परत असे करु नकोस म्हणून शेषेराव मांजरे यांनी हरकत घेतल्या वरून दोघात वाद झाला. ह्या वादात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी सहभाग घेतल्यामुळे तुंबळ मारमारी झाली..यावेळी मांजरे कुटूंबीयांवर विष्णू पवार,पिंटू आडे,शंकर पवार,मोहन पवार,संदीप पवार, विनोद पवार,विशाल पवार,सचिन पवार,अनू पवार, सिता पवार,सुरेखा पवार,ऊषा पवार यांनी जबर हमला चढवला.या मारहाणीत जळतणातले लाकूड,लोखंडी गज व दगडाचा वापर करण्यात आला. यात कैलास संभाजी मांजरे(२८) या तरुणाला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला.. मारहाणीत मांजरे कुटूंबातील संभाजी मांजरे,शोभा मांजरे,प्रभू मांजरे, अंकुष मांजरे,श्रावणी मांजरे व ज्योती मांजरे हे जखमी झाले आहेत.ही घटना पोलीसांना समजताच पो.नि. केशव लटपटे,पो.उप.नि. दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.परंतू तरुण ठार झाल्याचे समजल्यावरुन व पोलीस येत असल्याचे समजताच सर्व आरोपीं तेथून पळ काढला.

दरम्यान वडार समाजातील तरुणाचा खून झाल्यामुळे समाज एकत्रीत झाला व काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.तसेच या जमावाने जो पर्यंत आरोपींना अटक होणार नाही तो पर्यंत मयत कैलास मांजरे यांचे शव ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला.दरम्यान भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी संतप्त जमावाची समज काढली आणि तपासाला गती दिली.तसेच त्यांनी आरोपींना लवकरच अटक करु असे अश्वासन दिल्याने तणाव निवळला. आरोपींच्या व मयताच्या कुटूंबीयांत गणेशोत्सव काळात वाद होऊन मारहाण झाली होती. तांड्यातील कांही प्रतिष्ठीत स्थानिकांनी दोन्ही कुटूंबीयांना समोरा समोर बसवून तो वाद मिटवला होता.तर भोकरचे अप्पर पोलीस अधिक्षक अधिक्षक अविनाश बारगळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.या वरीष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी आरोपींच्या शोधार्थ तीन पोलीस पथक स्थापन करण्यात आले असून तपासचक्र गतीमान करण्यात आले आहेत.या प्रकरणी शेषेराव संभाजी मांजरे (२४) रा.नाईक नगर हदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हदगाव पोलीसांत ८ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पो.नि. केशव लटपटे हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरीरविक्री लावणा-या महिलेस अटक

News Desk

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

शाहरुख खानची मॅनेजर आणि गोसावी यांच्यात आर्यन प्रकरणासंबंधी पैशांची देवाणघेवाण ?

News Desk