नायर रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांना केली मारहाण

 नायर रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांना केली मारहाण

मुंबई | नायर रुग्णालयात ॲडमिट केलेल्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांतील १३ ते १५ जणांनी डॉक्टरांसोबत वादविवाद झाला. यानंतर नातेवाइकांनी तीन निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याची घटना रविवारी (१४ जुलै) घडली. तसेच संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयातील वस्तूंचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी डॉक्टर आणि नायर रुग्णालय प्रशासनाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1150522535215341569

नायर रूग्णालयात ४९ वर्षाचे रूग्ण राजकिशोर दिक्षीत याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ते अत्यावस्थेत होते. या स्थितीची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. दिक्षीत या रुग्णाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षा रक्षक मध्यस्थी करत असताना त्यांच्यावर देखील हल्ला केला. नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर मध्यवर्ती डॉक्टर सुरक्षा कायद्याचा अवलंब करावा, अशी मागणी मार्डतर्फे करण्यात आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top