HW News Marathi
क्राइम

अपहरण झालेल्या मुलाची चार तासात सुखरुप सुटका; जालना पोलिसांची कारवाई

जालना | आज (बुधवार, १८ मे) जालन्याच्या प्रेमगंगा प्लाझा येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय गौतम पासरमल गादीया यांचा अल्पवयीन पुतण्या हा पोद्दार शाळेच्या १० वी च्या परीक्षेला गेला होता. मात्र, परीक्षा संपुनही तो घरी परत आला नाही. त्याच दरम्यान चालकाच्या मोबाईलवरुन अपहृत मुलाचे वडील महाविर गादीया यांच्या मोबाईलवर फोन आला की, “तुमचा मुलगा सुखरुप हवा असल्यास चार कोटी रुपये आणून दे व मुलाला घेऊन जा” अशी खंडणीची मागणी केली त्यावरुन जालना पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६४ (अ) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जालन्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी पोलीस अधिक्षक रागसुधा आर यांना सुचना देऊन तात्काळ अपहृत मुलाचा व आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. यावरुन पोलीस अधिक्षक रागसुधा आर यांनी अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले. अपहरणर्त्याचा शोध घेण्याकरिता जालना पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमंलदार तसेच अंबड, गोंदी येथील अधिकारी व अंमलदार यांनी संपुर्ण परीसर पिंजुन काढला. वडीगोद्री, शहागड, बारसवाडा, बीड जिल्ह्यातील गेवराई व परिसर, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड इत्यादी ठिकाणी शोध घेत असतांना आरोपी अपहृत मुलाला सोबत घेऊन ठिकाण बदलुन पोलिसांना माहिती दिल्यास मुलाला ठार मारु अशी धमकी देत होते. याच दरम्यान आरोपी हे अंबड तालुक्यातील शहापूर येथे असल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांचे सर्व पथके शहापुर येथे रवाना झाले.

दरम्यान आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहुल लागताच आरोपीतांनी अल्पवयीन मुलाला वाहनासह शहापुर येथे सोडून पळ काढला. अपहृत मुलाला पोलिसांनी सुखरुप ताब्यात घेतले असून अपहरणकर्ताच्या मागावर पोलिसांची वेगवेगळे पथके रवाना झालेली आहेत. ही कार्यवाही विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक रागसुधा आर, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, गोंदी पोलीस ठाण्याचे शितलकुमार बल्लाळ, तालुका पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक बडते, अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरके व अमंलदार यांनी केलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलाला घेवून आई बेपत्ता

News Desk

मनीष भंगाळेला पोलिस कोठडी,

News Desk

गुजरात दंगलप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Aprna