काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा

नवी दिल्ली | बॉलिवूडचा बाईजान सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र सादर जोधपूर न्यायालयाने दिला दिला आहे. या प्रकरणात सलमानविरोधात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. राज्य सरकारने दाखल केलेला अर्ज सीजेएम ग्रामीण न्‍यायाधीशांनी फेटाळला. २००६ मध्ये सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. यात सलमानने त्याचा शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचे नमूद केलो होतो.

https://twitter.com/ANI/status/1140535855297118208

प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १० एप्रिल २००६मध्ये सलमानला ५ वर्षाची शिक्षा, तर भवाद गावातील प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी २००६ रोजी सलमानला एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. सलमानने हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी २००६ साली करण्यात आली होती.

काळवीट शिकार प्रकरण

‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू जोधपूरमध्ये गेले होते. या शुटिंग वेळी घोडा फार्म हाऊस येथे सर्व कलाकार थांबले होते. या शुटिंग दरम्यान भवाद गावात काळवीटची शिकार केल्याचा आरोप कलाकारांवर केला गेला. कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस, भवाद प्रकरण आणि आर्म्स अ‍ॅक्ट या चार ही काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यापैकी घोडा फार्म हाऊस काळवीट शिकार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १० एप्रिल २००६मध्ये सलमानला ५ वर्षाची शिक्षा, तर भवाद गावातील प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी २००६ रोजी सलमानला एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. १८ जानेवारी २०१७ रोजी आर्म्स अ‍ॅक्ट या प्रकरणात सुद्धा सलमानला निर्दोष ठरवले आहे. या तिन्ही प्रकरणात उच्च न्यायालाने सलमानला निर्दोष ठरवले आहे. राज्य सरकारने तिन्ही प्रकरणाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top