मुंबई | मुंबईच्या कांदिवली येथील ठाकूर व्हिलेज परीसरात एका ९ वी इयत्तेत शिकत असलेल्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारल्याने तीचा मृत्यू झाला आहे. सध्या हा आत्महत्याचा थरकाप उडविणार व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना पहायला मिळत आहे.
इमारतीवर चढून आत्महत्या करत असलेल्या मुलीने असे कोणतेही कृत्य करु नये यासाठी उपस्थित असलेले परीसरातील नागरीक आरडाओरड करत होते परंतु तीने परीस्थितीची तमा न बाळगता चक्क ८ व्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवन यात्रा संपवली. प्रचंड उंचावरुन तीने उडी मारल्यामुळे प्रसंगी उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी कुणीही तीला वाचवू शकले नाही.
हल्ली शालेय जीवनात मुलांवर असलेला अभ्यासाची अतीरीक्त तणाव या आत्महत्येचे कारण असेल का असा प्रश्न या आत्महत्येनंतर उपस्थित होत आहे. परंतु या आत्महत्येमागील मुख्य कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आत्महत्या केलेली तरुणी ठाकूर व्हिलेजच्या गार्डीनिया या इमारतीमधील रहिवाशी होती.तर बाजूला असलेल्या गुंडेजा इमारतीच्या ८ व्या मजल्यावरुन तीने गुरुवारी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता.
सदर घटनेनंतर या तरुणीला साई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा समता नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.