आई वडिलांच्या डोळ्यासमोर गळा दाबून हत्या

आई वडिलांच्या डोळ्यासमोर गळा दाबून हत्या

चंदिगड – स्वताच्याच मुलीच्या हत्येचा कट रचल्याप्रकऱणी पोलिस कर्मचार आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे, मुलगी शेजारच्या गावातील मुलाशी प्रेम करते म्हणून तिची हत्या करण्यात आली आहे. या कटात आई वडील आणि मामा असे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे मामा फरार आहे. वडील देवपाल 48, आई मोनी देवी असे आरोपीचे नाव आहेत. पोलिस याप्ररकणी अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरूणीचा मामा तिच्या आई-वडीलांच्या डोळ्यासमोर तिचा गळा दाबून हत्या केली. हत्या करण्यात आल्यानंतर ही आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. , पीडित तरुणी वंदनाचे शेजारच्या गावातील तरुण राहुलसोबत संबंध होतं. जेव्हा ही माहिती आई वडीलांना मिळाली तेव्हा त्यांनी त्याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. पण वंदना आणि राहुलच्या भेटीगाठी सुरु होत्या. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वंदनाच्या मामा आणि आई-वडिलांनी पुन्हा एकदा तिला धमकी देत राहुलला भेटू नको असं सांगितले. वंदनाने नकार दिला तेव्हा रागाच्या भरात रात्री दीड वाजता वंदनाच्या मामाने गळा दाबून तिची हत्या केली. हत्या होत होती तेव्हा वंदनाचे आई-वडिल शांत पाहत होते. तपास अधिकारी उप पोलीस निरीक्षक सतबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चौकशीदरम्यान दोघेही आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत होते.


Next Story
Share it
Top
To Top