दिल्ली | रोटोमॅक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारीवर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने कोठारीसह पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
कोठारीनं अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून ८०० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. युनियन बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारीनं व्याज किंवा कर्जाची रक्कमही परत केली नाही.
नियमांना 'हरताळ' फासून कोठारीला कर्ज देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानं युनियन बँकेतून ४८५ कोटी, तर अलाहाबाद बँकेतून ३५२ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. हा कर्जघोटाळा उघडकीस आल्यानंतर कोठारी अटक टाळण्यासाठी देशातून पसार झाल्याचं वृत्त धडकलं होतं. मात्र, मी कानपूरमध्येच असून, कुठेही पळालेलो नाही, असं कोठारीनं स्पष्ट केलं.