वडिलांच्या हत्येनंतर लेक हिट लिस्टवर

वडिलांच्या हत्येनंतर लेक हिट लिस्टवर

मुंबई | नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांचे देखील नाव हिट लिस्टवर असल्याचा दावा एटीएसने केला आहे. त्यांच्याबरोबर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांची देखील नावे आहेत.

अविनाश पवारची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी (३१ ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी केस डायरीचे वाचन केले. यात हिंदू धर्माविरुद्ध बोलणारे आणि अजित पवार, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्त दाभोलकर, रितू राज 'हिटलिस्ट'वर होते असल्याचे केस डायरीतून नावं उघड झाली. त्याचप्रमाणे पवारने काही ठिकाणांची रेकी केली असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.

एटीएसच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी

तसेच नालासोपारा प्रकरणात एटीएसने गेल्या आठवड्यात घाटकोपरमधून भटवाडीतून अटक केलेल्या पाचवा आरोपी अविनाश पवार यांच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची व्हावी, अशी मागणी एटीएसने सत्र न्यायालयात केली आहे. परंतु अविनाश पवार याचा नालासोपारा या प्रकरणात किती सहभाग आहे, हे एटीएसच्या अधिकाऱ्यांना कोर्टात सांगता आले नाही. यावरून न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


Next Story
Share it
Top
To Top