व्यापाऱ्याच्या मुलीची प्रियकराकडून हत्या

व्यापाऱ्याच्या मुलीची प्रियकराकडून हत्या

हैदराबाद- प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. लग्नासाठी प्रियसीकडून वारंवार आग्रह धरला जात होता. याला प्रियकर कंटाळला होती. त्यातून त्याने प्रेयसीला उंच डोंगरावरून ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून तरूणीने आत्महत्या केली असवी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर या प्रकरणाचे गुढ उकलले. चांदणी नावाची 18 वर्षीच्या तरुणीचे तिचा एकेकाळी वर्गमित्र असललेल्या साइ किरणसोबत प्रेमसंबंध होते. ती त्याला लग्नासाठी आग्रह धरत होती. परंतु या प्रकाराला तो कंटाळला होता. तिला टाळण्याचा तो प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी ती घरी आली असताना मित्रांना भेटण्यासाठी जाते म्हणून घराबाहेर पडली परंतु ती पुन्हा परतलीच नाही. तिच्या नातेवाईकांना पोलिसांत हरवल्य़ाची तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता ती एका बसस्थानकावर साई किरणसोबत जात असताना दिसून आली. त्यावरून पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली.


Next Story
Share it
Top
To Top