पुणे – भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंद गायब झाले आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण, येथे ही त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे एकबोटेंना अटक अटळ आहे. यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून एकबोटे यांचा कसून शोध घेतला जात आहे.
भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वदंना करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर जमावाने हल्ला केला होता. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंड गुरुजी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.