मुंबई । बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा बॉलिवूडची एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ३७६, ३२८, ३८४, ३४१, ३४२, ३२३आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1144224730658082816
पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी शुरू आहे. मात्र, हे प्रकरण दहा वर्ष जुने असल्याने पुरावे गोळा करण्यास पोलिसांना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले, त्यावेळी देखील पीडित अभिनेत्रीने याबाबत पोलिसात तक्रार केली होती. परंतु त्यावेळी आदित्य पांचोलीला समज देऊन सोडून देण्यात आले होते. आदित्य पांचोलीने अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधीत बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेलद्वारे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.