नागपूर | महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूर मधील गुन्ह्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. नागपुरातील दिघोरी येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
भाजपा कार्यकर्ते कमलाकर पोहनकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.