नालासोपारा प्रकरणातील आरोपी सुजीत कुमार यांना मारहाण  

नालासोपारा प्रकरणातील आरोपी सुजीत कुमार यांना मारहाण  

मुंबई | नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपी सुजीत कुमार याला पोलिसांनी कंबरेच्या पट्टा आणि काठीने मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने कुमार याला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहे.

पोलिसांनी कुमारला जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक अटक केले होते. कुमार यांना १२ सप्टेंबरला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने आपल्याकडे घेतला आहे. दहशतवादी विरोधी पथकाने आज (१७ सप्टेंबर) कुमार यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी न्यायालयात नेण्यात आले होते.

तसेच नालासोपारा स्फोटके प्रकरणी जळगावमधून ताब्यात घेत अटक केलेला आरोपी लीलाधर उर्फ विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठड़ीमध्ये २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे


Next Story
Share it
Top
To Top