नवी दिल्ली | भारतात जानेवारी ते जून या कालावधीत जवळपास ४ लाख ३६ हजारांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. एफ-सेक्युअर या संस्थेने जगभरातील सायबर गुन्ह्यांचे आणि सायबर हल्ल्यांचा सर्व्हे केला आहे. एफ-सेक्युअर संस्थेने सादर केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत. यातही रशियामधून भारतावर सर्वाधिक (२,५५,५८९) सायबर हल्ले करण्यात आले असल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ अमेरीका (१,०३,४५८), चीन (४२,५४४), नेदरलँड (१९,१६९) आणि जर्मनी (15,३३०) या देशांमधून भारतावर सायबर हल्ले झाले आहेत.
भारतामधून देखील इतर देशांवर हल्ले करण्यात आले आहेत. भारतामधून ऑस्ट्रिया (१२,५४०), नेदरलँड (९,२६७), ब्रिटन (६३४७), जपान (४,७०१ ) आणि युक्रेन (३,७०८) या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत.