पोलिसांनी केलं अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित

पोलिसांनी केलं अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित

रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची शक्यता वाढली

मुंबई – न्यायायलासमोर हजर होण्यासाठी दिलेली ३० दिवसांची मुदत संपूनही हजर न राहिलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीला अखेर पोलिसांनी फरार घोषित केलंय. त्यासंदर्भातील नोटीस तिच्या मुंबईतल्या यारी रोडवरील घरावर ठाणे पोलिसांनी चिकटवलीय.

सुमारे दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं आहे. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ममता कुलकर्णीला कोर्टासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरीही ममता कुलकर्णी हजर राहिली नाही तर तिची संपत्ती जप्त केली जाऊ शकते आणि तिच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीसह तिचा नवरा विकी गोस्वामीही फरार आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे. या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top