मुंबई | रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या अंगावर केमिकल टाकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. निर्भया पथक आणि पोलिसांनी आज (१८ जानेवारी) अंधेरी रेल्वे स्थानकात आरोपीला अटक करण्यात आली आहे. साध्या गणवेशातील पोलिसांसह निर्भया पथक देखील या आरोपीचा शोध घेत होते. आता अखेर या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
मुंबईत रेल्वेच्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅकचे सलग दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.