पोलिसांकडून आरोपीची हत्या

पोलिसांकडून आरोपीची हत्या

सांगली: चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली. अनिकेत कोथळे असे या आरोपीचे नाव असून अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.

कोल्हापूर रस्त्यावर एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय २६) आणि अमोल भंडारी (वय २३) या तरुणांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या बाजूला डिटेक्शन ब्रँचचे आॅफीस असून सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचच्या कार्यालयात नेले जात होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी पळ काढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा देखील नोंदवला होता. यातील अमोल हा मंगळवारी संध्याकाळी निपाणीत सापडला असला तरी अनिकेतचा थांगपत्ता लागत नव्हता.


Next Story
Share it
Top
To Top