गजानन हजारे
रिसोड येथे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गणेश मंडळाची बैठक घेऊन शांततेत गणेश उत्सव साजरा करा असे आव्हान करत गणेश उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करा असे आदेश पोलिसांना दिले आहे.
रिसोड येथील अप्पास्वामी हॉल मध्ये शांतता समिती बैठक नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मागर्गदर्शक मोक्षदा पाटील , पोलीस उपविभागीय अधिकारी किरण धात्रक,तहसीलदार सुरडकर, मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, रिसोड येथील ठाणेदार राजेंद्र पाटील आदीं उपस्थिती होते.याच् सोबत शहरातील व तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी,शांतंता समिति सदस्य,पत्रकार बांधव,राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बार कौंसिल चे सदस्य,पोलिस पाटिल,तंटामुक्ति अध्यक्ष,पोलीस मित्र,शांति दूत ,मेडिकल सोसीएशन,डॉक्टर असोसीएशन,नगर पंचायतचे मा.अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व सन्माननिय सदस्य गण,नगर परिषद मुख्याधिकारी तसेच सर्व कर्मचारी,विज वितरण कंपनीचे अभियंता तसेच तांत्रिक कर्मचारी, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चाफेश्वर गांगवे यांनी आभार व्यक्त केले