एकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

एकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सांगली । सांगलीमध्ये एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज शहरातील गांधी चौक परिसरामध्ये हा प्रकार आहे. तानाजी दंडगुले असे जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिरज शहरातील गांधी चौक येथील दारुच्या दुकानात दारु पिण्यासाठी तानाजी दंडगुले आले होते. याचवेळेस पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातले अडीच हजार रुपयांची रोकड काढून घेतली.दांडगुले यांनी मारहाण करणाऱ्यांना विरोध केला त्यावेळी दंडगुले यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये दंडगुले गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.आरोपींना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top