पुणे अडीच वर्षांच्या चिमुकलीची अपहरण करून हत्या

पुणे अडीच वर्षांच्या चिमुकलीची अपहरण करून हत्या

पुण्यातील धायरी परिसरातील अडीच वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह अढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. श्रुती विजय शिगणे अडीच वर्षाच्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत.

शनिवारी रात्री चिमुरडीचे अपहरण झाले होते याप्रकऱणी तिच्या आईने सिंहगड पोलिस ठण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केले मात्र रविवारी सकाळी राहत्या घराजवळील प्रायोजा सिटीच्या मागे तिचा मृतदेह अढळून आला. स्थानीकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस घटना स्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून मुलीचे अपहरण करून हत्या केल्याची संशय व्यक्त केली जाते. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहे.


Next Story
Share it
Top
To Top